महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण एमआयडीसी : येथील फेज टू मधील वराळे गावच्या हद्दीत विनायक भिकाजी पानमंद ( वय ५८, रा. शिंदेगाव, ता. खेड, जि. पुणे ) या शेतकऱ्याचा मृतदेह आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आढळला असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
वराळे गावच्या हद्दीत हा मृतदेह व घटनास्थळा जवळच त्यांची दुचाकी आढळली. चाकण ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. पोलिसांनी आकस्मिक मयत दाखल केले असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे म्हाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांनी सांगितले.
त्यांच्यामागे पत्नी, १ मुलगा, २ मुली, बहिणी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. २००८ सालचे डाऊ आंदोलनाचे ते प्रवर्तक होते. ते शेती व्यवसाय उत्तम प्रकारे करीत होते. उद्योजक अजित पानमंद यांचे ते वडिल होत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.