गुन्हेगारी

चाकण एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; ● दोन महिलांसह ९ जणांना अटक, ३३ लाखाचा मुद्देमाल जप्त, म्हाळुंगे पोलिसांची कारवाई

चाकण एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद;
● दोन महिलांसह ९ जणांना अटक, ३३ लाखाचा मुद्देमाल जप्त, म्हाळुंगे पोलिसांची कारवाई

महाबुलेटीन न्यूज 
चाकण एमआयडीसी : कंपनीतील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून व डोळ्यात मिरची पावडर टाकून कंपनीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला म्हाळुंगे इंगळे पोलिसांनी गजाआड केले आहे. दरोड्यातील चोरलेले साहित्य विक्रीसाठी आणताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून ३३ लाख ३४ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहन विजय सूर्यवंशी ( वय २८ वर्ष, रा. विठोबा कॉम्प्लेक्स, कासारवाडी, पुणे ), ● राहुल अंकुश क्षीरसागर ( वय २१ वर्ष, रा. काळा खडक, मस्जिदजवळ, वाकड, पुणे ), ● रतन महादेव दनाने, वय १९ वर्ष रा-काळोखेवाडी, तळेगाव दाभाडे पुणे ), ● अब्दुल सत्तार अब्दुल करिम ( वय २३ वर्ष, रा. पवारवस्ती, दापोडी, पुणे ), ● अन्सार जुल्फीकार खान ( वय २५ वर्ष, रा. एस.एम.एस. कॉलनी, दापोडी, पुणे ), ● मिना अंकुश क्षीरसागर ( वय ४० वर्ष रा. काळा खडक, मस्जिदजवळ, वाकड, पुणे ), ● अरबाज रईस शेख, वय २० वर्ष रा. एस. एम. एस. कॉलनी दापोडी पुणे ), ● अर्जुन मोहनलाल भट (वय २४ वर्ष रा. सानेचौक, चिखली, पुणे ), ● विद्या मनोज मगर ( वय २३ वर्ष रा. काळोखेवाडी, तळेगाव दाभाडे, पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर किरण गिरी (पुर्ण नाव, पत्ता माहीती नाही) व हर्षद खान (पुर्ण नाव, पत्ता माहीती नाही) हे दोन आरोपी फरार झाले आहेत. न्यायालयाने सदरचे आरोपींना दि. ३० जून २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. २५ जून २०२१ रोजी मध्यरात्री २ ते ३ वा. चे सुमारास मौजे कुरुळी, ता. खेड, जि. पुणे गावचे हद्दीतील व्ही.टेक इंन्डस्ट्रीज इंडीया प्रा.लि. या कंपनीचे कंपाऊंड वॉलवरुन कंपनीचे आवारत ६ पुरुष व २ महीला असे ८ दरोडेखोरांनी हातामध्ये चाकु, कटावणीसह प्रवेश केला. सिक्युरिटी गार्ड यांना चाकूचा धाक दाखविला व तोंडावर मिरची पुड टाकून हाताने मारहाण करून अंगावर चादर टाकुन डांबुन ठेवले. आणि कंपनीमधील तांबे पितळ या धातुचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग हार्नेस असे स्पेअर पार्ट आणी सिक्युरिटी गार्डचे तिन मोबाईल फोन असा एकूण २५,८७,२४७/रुपयांचा माल दरोडा घालुन लुटुन नेला. सदर बाबत चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ७५६ / २०२१, भा.द.वि. कलम ३९५, १२० (ब), ५०६ (२) हा दि. २५/०६/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दरोडयाची माहीती महाळुंगे पोलीस चौकीस दि. २५ जून २०२१ रोजी सकाळी ८:३० वा. चे सुमारास प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पो. निरीक्षक अरविंद पवार यांनी पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांचे मार्गदर्शन व सुचनानुसार दरोडेखोरांचे शोध करण्यासाठी ३ तपास पथक नेमले. दरोडेखोरांनी कंपनीमधील माल लुटुन नेण्यासाठी अशोक लेलन्ड कंपनीचा क्रिम रंगाचा टेम्पो वापरल्याची माहीती सिक्युरिटी गार्ड यांचेकडुन प्राप्त झाली. परंतु सदर टेम्पोचे नंबरवर कागद लावुन नंबर झाकण्यात आल्याने नंबर मिळू शकला नाही, त्यामुळे कंपनीचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करताना एका सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये टेम्पोचे नंबरवर लावण्यात आलेला कागद निघुन नंबर अस्पष्ट स्वरुपात दिसुन आल्याने टेम्पोचे नंबरचा अंदाज बांधुन वाहन पोर्टलवर नंबरची पडताळणी केली असता एका अशोक लेलॅन्ड टेम्पोचा नंबर सी.सी.टी.व्ही. मध्ये दिसणारे टेम्पो नंबरशी साम्य असल्याने त्या वाहन मालकाची माहीती प्राप्त करून त्याचेकडे तपास करण्यात आला.

सदर संशयीत टेम्पो मालकाकडुन प्राप्त माहीती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे कंपनी मध्ये सशस्त्र दरोडा टाकणारे दरोडेखोर हे लुटलेला माल विक्री करण्यासाठी यमुनानगर निगडी परिसरात गेले असल्याचे निष्पन्न झाले.

स.पो. निरीक्षक श्री दत्तात्रय गुळीग व स्टाफने गोपनिय माहीतीचे आधारे ४ तासात दरोडेखोरांचा शोध घेवुन ते लुटलेला माल एका ट्रान्सपोर्ट गोडावुन मध्ये विक्री करीत असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीसांशी झालेल्या झटापटीमध्ये २ दरोडेखोर पळुन जाण्यामध्ये यशस्वी झाले असुन ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांकडुन ३३ लाख ३४ हजार ६९७ रुपये किंमतीचा माल जप्त केला.

पोलिसांनी दरोडेखोरांकडून जप्त केलेला माल पुढीलप्रमाणे :
१) २५.७५.५४७/- रुपयांचे तांबे-पितळ या धातुचे स्पेअर पार्ट. २) ४,००,०००/- रु. चा अशोक लेलन्ड टेम्पो क्र एम एच १४/जी डी/७८२७ ३) २.९०,०००/- रु. ची १ पल्सर मो. सा. १ होन्डा स्पेल्डर, १ करिझ्मा असे ३ मोटार सायकल. ४) ६७,०००/- रु. चे ०७ मोबाईल फोन (आरोपींचे वापरते) ५) १५००/- रु. चा एक मोबाईल फोन सिक्युरिटी गार्ड कडुन काढुन घेतलेला. ६) ६५०/- रु. चे १ लोखंडी कटावणी, ३ चाकु, मिरची पुड व ३३.३४,६९७/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १- श्री मंचक इप्पर, पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, सुरेश यमगर, पोलीस अंमलदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे, प्रितम ढमढेरे, जयकुमार शिकारे, साहेबराव टोपे, सोनम खंडागळे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टमपल्ले हे करीत आहेत.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.