कृषी

चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक घटूनही भावात घसरण, हिरवी मिरची, वाटाणा, सिमला, फरसबी, वालवड सह मेथीच्या भावात वाढ, एकूण उलाढाल ५ कोटी २० लाख रुपये

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण :
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक घटूनही भावात १०० रुपायांनी घसरण झाली. बटाट्याची आवक वाढून भाव स्थिर राहिले. तरकारी बाजारात हिरवी मिरची, वाटाणा, सिमला, फरसबी, वालवड सह मेथीच्या भावात वाढ झाली. जनावरांच्या बाजारात म्हशींची विक्री वाढली, तर शेळ्या-मेंढ्यांची विक्री घटली. बाजारात एकूण ५ कोटी २० लाख रुपये उलाढाल झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ६ हजार ७५० क्विंटल झाली. कांद्याची आवक निम्म्याने घटूनही भाव १०० रुपयांनी घटले. कांद्याचा कमाल भाव १७०० रुपयांवरून १६०० रुपयांवर खाली आला.

बटाट्याची एकूण आवक १४०० क्विंटल होऊन भाव स्थिर राहिले. बटाट्याला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

या आठवड्यात भूईमुग शेंगांची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक २७ क्विंटल झाली. लसणाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये कमाल भाव मिळाला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक २९५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

* शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :–
कांदा – एकूण आवक – ६७५० क्विंटल. भाव क्रमांक १ – १६०० रुपये, भाव क्रमांक २ – १४०० रुपये, भाव क्रमांक ३ – ११०० रुपये.

बटाटा – एकूण आवक – १४०० क्विंटल. भाव क्रमांक १ – २५०० रुपये, भाव क्रमांक २- २२०० रुपये, भाव क्रमांक ३- १९०० रुपये.

* फळभाज्या :-
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे :-

टोमॅटो – ३३० क्विंटल ( ५०० ते १००० रू. ), कोबी – २०८ क्विंटल ( १००० ते १४०० रू.), फ्लॉवर – २४५ क्विंटल ( ४०० ते ६०० रु.), वांगी – ९२ क्विंटल ( २००० ते ३००० रु.), भेंडी – ९६ क्विंटल ( २००० ते ४००० रु.), दोडका – ६९ क्विंटल ( २५०० ते ३५०० रु.), कारली – ७४ क्विंटल ( ३००० ते ४००० रु.), दुधीभोपळा – ७८ क्विंटल ( १००० ते २००० रु.), काकडी – ९० क्विंटल ( १००० ते २००० रु.), फरशी – ५६ क्विंटल ( ४००० ते ५५०० रु.), वालवड – ५४ क्विंटल ( ४००० ते ६००० रुपये), गवार – ६२ क्विंटल ( ३००० ते ५००० रु. ), ढोबळी (सिमला) मिरची – १६४ क्विंटल ( ३००० ते ६००० रु.), चवळी – ३६ क्विंटल ( २५०० ते ३५०९ रु.), वाटाणा – १०० क्विंटल ( ६००० ते ७००० रु.), शेवगा – ५० क्विंटल ( १००० ते १५०० रु.), गाजर – १६० क्विंटल ( १५०० ते २००० रु.).

* पालेभाज्या :-
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :-

मेथी – २४,५०० जुड्या ( ८०० ते १००० रुपये,), कोथिंबीर – २८,९५० जुड्या ( ६०० ते १००० रुपये ), शेपू – ३८०० जुड्या ( ६०० ते ९०० रुपये ), पालक – ४६०० जुड्या ( ५०० ते ७०० रुपये).

* जनावरे :-
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४० जर्शी गाईपैकी ३३ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रु.), ७५ बैलांपैकी ५५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रु.), १२० म्हशीपैकी १०५ म्हशींची विक्री झाली.( २०,००० ते ८०,००० रु.), ११ हजार ५२० शेळ्या-मेंढ्यापैकी १० हजार ५६० शेळ्या-मेंढ्यांची विक्री झाली. ( २००० ते १५,००० रु.). जनावरांच्या बाजारात २ कोटी ७० लाखाची उलाढाल झाली.

MahaBulletinTeam

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.