गुन्हेगारी

चाकण मधील तरुणाच्या खुनातील आरोपी निष्पन्न, एकास अटक, सहा जणांवर गुन्हा दाखल, बहिणीची छेड काढल्याने १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न

चाकण मधील तरुणाच्या खुनातील आरोपी निष्पन्न, एकास अटक, सहा जणांवर गुन्हा दाखल,
बहिणीची छेड काढल्याने १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न

महाबुलेटीन न्यूज
चाकण ( पुणे ) : बहिणीची छेड काढल्याच्या रागात सोमवारी ( दि. ६ सप्टेंबर ) सोळा वर्षीय मुलांचे अपहरण Kidnapping करून डोक्यात दगड घालून खून Murder करण्यात आला असून सदर घटनेतील आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली. 

मुलीच्या भावासह ७ जणांचा यामध्ये समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रोहित प्रभू साहनी ( रा. झित्राईमळा, चाकण, मुळगाव समस्तीपुर, बिहार ) असे मयत मुलाचे नाव आहे. ६ सप्टेंबर दिवशी अराफत शिकीलकर याने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले.

रोहित हा एका हॉटेलसमोर बसला होता. मन्सूरने तिथून रोहितच्या दुचाकीवरून अपहरण करण्यात आले आहे. चाकण मार्केट यार्डच्या समोर पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या मैदानात त्याला आणले होते. त्या मोकळ्या मैदानात अराफत आणि त्याचे आणखी ५ मित्र उपस्थितीत होते. या सर्वांनी मिळून रोहितला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.

तर अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात जोरात प्रहार केला आहे. मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला आहे. यात रोहितची हत्या झाली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूरला अटक केली आहे. अराफत आणि त्याच्या आणखी ५ मित्रांचा शोध सुरु आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मारहादर्शनाखाली चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 day ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

4 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.