महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील रासे फाटा येथील हॉटेल मराठा मध्ये आलेल्या तिघांपैकी एकाने गोळीबार करून हॉटेल चालकावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी डोक्याला चाटून गेली. हॉटेल चालक स्वप्निल उर्फ सोप्या शिंदे ( वय ३२, रा. रासे. ता. खेड, जि. पुणे ) याच्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अजय गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपी राहुल पवार व तिसरा आरोपी फरारी झाला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील शिंदे उर्फ सोप्या याच्यावर सोमवारी ( दि. १८ ) रात्री साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. स्वप्निल शिंदे हॉटेलमध्ये असताना तिघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की ही झाली.
तिघांपैकी एकाने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी स्वप्निल उर्फ सोप्या शिंदे याच्या डोक्याला चाटून गेली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. पोलिसांना हॉटेलमध्ये एक राउंड सापडला.
हा गोळीबार जुन्या वादातून झालेला आहे.
स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे हा तडीपारीतला आरोपी असून तडीपारी संपल्यानंतर गुन्हेगारी सोडून त्याने हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. अजय गायकवाड व राहुल पवार हे सुद्धा तडीपारितले आरोपी आहेत. या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली.
राहुल पवार व दुसरा आरोपी हे पळून गेले असून पोलिसांनी अजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. अजय गायकवाड, राहुल पवार यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पवार याच्या भावाचा काही महिन्यापूर्वी महाळुंगे इंगळे येथे खून झाला होता.
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
This website uses cookies.