साक्षी सचिन मोहिते
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील गोनवडी मध्ये म्हशी सांभाळण्यासाठी आणलेल्या १८ वर्षीय माऊली नावाच्या मुलाने किरकोळ भांडणातून शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी सचिन मोहिते ( वय १६ वर्षे ) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून आरोपी फरार झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार दि. ८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबत प्रवीण मोहन मोहिते ( वय ३५, रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माऊली ( पूर्ण नाव नाही, वय १८, मूळ रा. नासिक ) हा मोहिते कुटुंबात गुरे सांभाळण्यासाठी मागील ७-८ वर्षांपासून राहात होता. काल किरकोळ भांडणाच्या कारणावरून माऊलीने बाळू बाबुराव मोहिते यांच्या पड जमिनीत साक्षीचा गळा कशानेतरी दाबून खून केला. आरोपी या घटनेनंतर फरार झाला असून पोलीस पथक शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त इप्पर मंचक, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड, पोलीस उपनिरीक्षक पी.आर. कठोरे, व पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड हे करीत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.