आदिवासी

सी. ए. परीक्षेत पुणे विभागातून प्रथम आलेल्या ऋतुजा घोलपचा सत्कार

सी. ए. परीक्षेत पुणे विभागातून प्रथम आलेल्या ऋतुजा घोलपचा सत्कार

महाबुलेटीन न्यूज 
घोडेगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी घेतलेल्या सी. ए. इंटरमिजिएट परीक्षेत पुणे केंद्रातून ऋतुजा घोलप ही प्रथम आल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव येथील प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी तिचे कौतुक करत सत्कार केला. 

फुलवडे ता. आंबेगाव येथील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक अविनाश घोलप यांची कन्या ऋतुजा घोलप हिने सी. ए. इंटरमिजिएट परीक्षेत ८०० पैकी ६१८ गुण मिळवून पुणे केंद्रात प्रथम क्रमांक संपादित केला. तिने आपल्या शिक्षणाची सुरुवात न्यू इंग्लिश मीडियम स्कुल घोडेगाव येथून केली. त्यानंतर तिने कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल येडगाव, ता. जुन्नर येथे एस. एस. सी. परीक्षेत ९७ टक्के गुण मिळविले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) मध्ये शिक्षण घेऊन एच. एस. सी. परीक्षेत ९३ टक्के गुण संपादित केले. त्याचवेळी सी. ए. होण्याचे स्वप्न बाळगून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मध्ये प्रवेश घेऊन सी. ए. फाउंडेशन नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ४०० पैकी ३४६ गुण मिळवून भारतात १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यावेळी सी. ए. इंटरमिजिएट नोव्हेंबर २०२० मधील परीक्षेत तिने भारतात ५० वा क्रमांक, तर पुणे केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असताना घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी तिचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर, विकास निरीक्षक विठ्ठल चव्हाण, राजाराम गाडेकर, शरद काळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
———————————————————————–
कोरोनाच्या संकटामुळे या परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. अखेर २२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर मध्ये या परीक्षा पार पडल्या. कोरोना काळात घाबरून न जाता धाडसाने पुणे येथे राहून जिद्दीने अभ्यास करून ऋतुजाने परीक्षेला सामोरे जात हे यश मिळविले आहे. तिचे हे कार्य खरोखरचं कौतुकास्पद आहे.”
– आर. बी. पंढुरे, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव ता. आंबेगाव.
———————————————————————–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.