गुन्हेगारी

ब्लाऊजने गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, सून व मुलाला अटक, आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी

ब्लाऊजने गळा आवळून सुनेने केला सासूचा खून,
सून व मुलाला अटक, आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी

महाबुलेटिन न्यूज : प्रतिनिधी 
तळेगाव दाभाडे ( पुणे ) दि. 24 मे : घरगुती वादातून सुनेने सासूचा ब्लॉऊजने गळा आवळून खून करुन पोत्यात मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी टेरेसवर ठेवून नंतर एका झुडपात मृतदेह लपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.21) सकाळी 10 वा तळेगाव दाभाडे ( ता.मावळ ) येथे घडली. खुनातील आरोपी सून व मुलाला रविवारी ( दि. 23 मे ) सायंकाळी सहा वाजता अटक करण्यात आली. 

बेबी गौतम शिंदे ( वय 50 वर्ष, रा. टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे ) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. पूजा मिलिंद शिंदे (वय 22) व मिलिंद गौतम शिंदे ( वय 29, दोघे रा. टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे ) असे या प्रकरणातील आरोपी सून व मुलाचे नाव आहे. मयत बेबी यांचा धाकटा मुलगा अमित गौतम शिंदे (वय 22) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू बेबी शिंदे हिच्या सोबत आरोपी सून पूजा शिंदे हिचे घरगुती कारणामुळे वाद होत होते, म्हणून त्याचा राग मनात धरून आरोपी पूजा हिने ब्लाऊजच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने खुनानंतर सुनेने सासूचा मृतदेह एका पोत्यात भरून घराच्या टेरेसवर दोन दिवस ठेवला होता. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुजा शिंदे हिने रविवारी सकाळी सदर मृतदेह पतीच्या मदतीने शेजारी असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये टाकून दिला होता. सदर प्लॉटमधून दुर्गंधी येत असल्याने प्लॉट शेजारील नागरिकांनी याबाबत तळेगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, एका पोत्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तसेच टेरेसवर व सोसायटीचे पाय-यावर पडलेले रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे याने धुऊन-पुसून पुरावा नष्ट केला.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असता एका सीसीटीव्हीच्या फुटेजमधून सदर खुनाचा उलगडा झाला. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पूजा शिंदे व मिलिंद शिंदे यांना ताब्यात घेत अटक केली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, नारायण पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, महेश मतकर, ज्ञानेश्वर झोल आदींनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी आरोपींना अटक करून सोमवारी (दि.२४) वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील हे करत आहेत.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.