कृषी

भीमाशंकर कडून अंतिम हप्त्याची व खोडवा अनुदानाची रक्कम बँकेत वर्ग

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने अंतिम हप्त्याची व खोडवा अनुदानाची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क, मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार अंतिम हप्त्याचा दर रु.१५०/- प्रती मे. टनाप्रमाणे देण्याचे ठरले, त्यापैकी रु. ५०/- प्रति मे.टनाप्रमाने कपात करून रोखीने रु. १००/- प्रति मे.टनाप्रमाने रक्कम रु. ६ कोटी ३२ लाख १५ हजार व खोडवा ऊसाचे अनुदान को. २६५ जातीसाठी रु. १००/- प्रति मे.टन व को.८६०३२ व इतर जातीसाठी रु. १२५/- मे. टनप्रमाणे रक्कम रु. २ कोटी २६ लाख ऊस उत्पादकांचे बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

सन २०१९-२० गाळप हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण ६,३२,२१५ मे.टनासाठी अंतिम हप्ता रु.१५०/- प्रती मे.टन मधून भाग विकास निधी रु. ४०/- प्रती मे.टन व भीमाशंकर शिक्षण संस्था निधी रु.१०/- प्रती मे.टन याप्रमाणे रु.५०/- प्रती मे.टन वजाजाता रु. १००/- प्रती मे.टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. कारखान्याने यापुर्वी गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी. प्रमाणे रु. २६९०/- प्रती मे.टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांना अदा केलेली आहे. गाळप केलेल्या संपूर्ण ६,३२,२१५ मे.टन ऊसासाठी एकूण ऊस दर रु. २८४०/- प्रती मे.टन ऊस उत्पादकांना अदा केलेला आहे. तसेच जाहीर केल्याप्रमाणे सन २०१९-२० गाळप हंगामात खोडवा ऊसाकरीता को. २६५ जातीसाठी रु. १००/- प्रति मे.टन व को. ८६०३२ व इतर जातीसाठी रु. १२५/- मे. टन याप्रमाणे अनुदानाची रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामुळे सभासद व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार असून ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत तर दिलेलीच आहे त्याशिवाय एफ.आर.पी. च्या पुढील रक्कम अंतिम हप्त्याचे स्वरुपात सर्वात प्रथम शेतक-यांना अदा करुन आघाडी घेतली आहे. भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली असून दिवाळीसाठी साखर व इतर सवलती बाबतही कायम समानतेचे धोरण ठेवलेले आहे. गाळप हंगाम २०२०-२१ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन श्री. बेंडे यांनी केले.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.