उदघाटन/भूमिपूजन

भिगवण येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके यांच्या हस्ते व उपसभापती यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले.
तालुक्यातील या पहिल्याच सुसज्ज कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते काल संध्याकाळी होणार होते. मात्र काल दुपारीच भाजपच्या वतीने उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना सभापती पुष्पा रेडके म्हणाल्या की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री असताना त्यांनी भिगवण येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिगवण, निमगाव केतकी यासह तालुक्यात पाच ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावीत, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी लावून धरली होती. त्यामुळे भिगवण येथे कोविड सेंटरची उभारणी झाली. भिगवण व परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता इंदापूर पंचायत समिती व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने आज भिगवण येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. निमगाव केतकीचे कोविड सेंटर देखील सज्ज झाले आहे.
उपसभापती संजय देहाडे म्हणाले की, भिगवणमध्ये कोविड सेंटर उपलब्ध झाल्याने येथील नागरिकांना त्याचा लाभ होईल.
इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते दिवंगत रमेश जाधव यांची भिगवणमध्ये ट्रॉमा सेंटर व्हावे अशी अतीव इच्छा होती. ती पूर्ण झाली, परंतू ते पहायला जाधव आपल्यात नाहीत, ही मोठी खंत आहे.
MahaBulletin Team

Share
Published by
MahaBulletin Team
Tags: #corona

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.