महाबुलेटीन न्यूज नेटवर्क / नितीन शहा
भंडारदरा : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात गत तीन दिवसांपासून पावसाचा धुवांधार सुरुच असल्याने नव्याने पाण्याची जोरदार आवक होत आहे. ११०३९ दलघफु क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळी ६ वाजता ८९५१ म्हणजेच ८१% झाला होता. काल दिवसभरात ७३७ दलघफु नवीन पाण्याची आवक झाली आहे. पावसाचे तांडव सुरुचं असल्याने विद्युत निर्मिती टनेल द्वारे ८३५ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. तर कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगातही संततधार टिकून असल्याने वाकी लघुपाटबंधारे तलावावरुन १०२२ क्युसेसने पाणी प्रवरेची उपनदी कृष्णावंती नदी पात्रात झेपावत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असुन शुक्रवारी सकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ५३१७ म्हणजेच ६४% वर पोहचला होता.
शुक्रवारी सकाळी ६ वाजता संपलेल्या चोवीस तासात घाटघर येथे १० इंच, रतनवाडी येथे ९ इंच तर भंडारदरा ९ इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गत चोवीस तासात घाटघर २५२ मीमी, रतनवाडी २३९ मीमी, पांजरे २३२ मीमी, तर भंडारदरा २११ मीमी व वाकी १५० मीमी पावसाची नोंद झाल्याने धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे, त्यामुळे जनजीवन गारठुन गेले आहे. एकंदरीत पाहता येत्या दोन तीन दिवसात धरण पुर्ण क्षमतेने भरेल.
——–
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.