पुणे जिल्हा

अखेर भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी बायकामुलांसह उतरले पाण्यात…

भामा-आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नदीच्या वाहत्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू, आमरण उपोषणही सुरू,
पोलीस बंदोबस्त, एनडीआरएफचे जवान व बोटी तैनात,
पोलीस प्रशासनाची आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी उडाली त्रेधातिरपीट, प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध व तरुण शेतकरी बायका मुलांसह नदीपात्रात उतरुन जलसमाधी आंदोलन केले चालू

 

महाबुलेटीन न्यूज / दत्ता घुले
शिंदे-वासुली : भामाआसखेड प्रकल्पबाधीत २३ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी व शासनाने दडपशाहीच्या मार्गाने चालू केलेल्या जलवाहिनीच्या कामा विरुद्ध आज पासून करंजविहीरेतील धामणे फाटा येथे निवडक प्रकल्पग्रस्तांसह आजपासून आमरण चालू केले आहे. जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळ पर्यंत दखल घेऊन काम बंद केले नाही तर २३ गावांमध्ये तेथील प्रकल्पग्रस्त शेतकरी नदीच्या वाहत्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. अखेेेर प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध व तरुण शेतकरी बायका मुलांसह नदीपात्रात उतरुन जलसमाधी आंदोलन चालू केले आहे.

खेडमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभारी सुनिल जोशी खेडमध्ये असतानाही आले नाही, अथवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय तेली सुद्धा उपोषणकर्त्यांना भेटायला आले नाही. व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांकडे दूर्लक्ष केले, असा प्रकल्पग्रस्तांनी आरोप करुन शेवटी चिडीस गेलेल्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी पाच नंतर आंबोली, अखतुली, वेल्हावळे, साबळेवाडी, पराळे, वाघू, टेकवडी, चोरघेवाडी, गवारवाडी, वहागाव, कोळीये या गावातील प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध व तरुण शेतकरी बायका मुलांसह नदीपात्रात उतरुन जलसमाधी आंदोलन चालू केले आहे.

पोलीस प्रशासनाची आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी उडाली त्रेधातिरपीट :-
पोलीस प्रशासनाने याची पहिलीच खबरदारी घेतली असल्याने एनडीआरएफचे जवान व पुणे ‌व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून सहा बोटी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. आता पोलीस प्रशासन जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक गावात धावपळ उडाली आहे.

इकडे करंजविहीरेला प्रकल्प ग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे, तर दुसरीकडे २३ गावात जलसमाधी आंदोलन चालू आहे. जोपर्यंत जलवाहिनेचे काम बंद करत नाही, तोपर्यंत दोन्ही प्रकारचे आंदोलन चालूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
——————————-
आंदोलनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.