कोरोना

बारामती तालुक्यात आज सहा जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह;एकूण रुग्ण संख्या १५४

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
बारामती : तालुक्यात आज सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातून एकूण ९६ जणांचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८३ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १३ नमुन्यांचा अहवाल अजुन प्रतीक्षेत आहे. प्राप्त झालेल्या अहवाला पैकी एकूण ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये बारामती शहरातील ४, कांबळेश्वर येथील एक युवक व पारवडी येथील एक पुरुष असे ग्रामीण भागातील दोन असा एकूण ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर ७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. बारामती मधील एकूण रुग्ण संख्या १५४ इतकी झालेली आहे. बारामती शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुई येथील २ जणांचा व तांबे नगर येथील १ जण व जाधव वस्ती फलटण रोड बारामती येथील १ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच रात्री माळेगाव येथील पूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला पुणे येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे. बारामती मघील मृतांची संख्या आता २५ झाली आहे. तसेच उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या ७३ झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

6 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.