कोरोना

आंबेगाव तालुक्यात कोरोना बधितांची संख्या तीनशे पार

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
घोडेगाव : रविवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ३३ ने वाढली आहे. त्यामध्ये पिंपळगाव ७, घोडेगाव ११, मंचर २, थुगाव १, गावडेवाडी ४, शिनोली २, अवसरी खुर्द २, काळेवाडी दरेकरवादी २, काठापुर १, पारगाव १ अशा एकूण ३३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३१७ झाली आहे. त्यापैकी २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५ कोरोना बधितांचा मृत्यू झाला असून १०९ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
 कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. गाव निर्जंतुकीकरण करून स्वच्छता केली जाणार आहे. दिवसेंदिवस कोरोना बधितांच्या संख्येत होणारी वाढ पहाता तालुक्यातील १०४ गावांतील नागरिकांची चिंता वाढली आहे. प्रशासन खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना राबवत आहेत. नागरिकांनी घरातच बसून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

14 hours ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

3 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

7 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

This website uses cookies.