बारामती : शहरात कोरोना रुग्ण संख्येत तीनची भर पडली असून हा आकडा आता १२७ वर गेला आहे. बारामतीत एकूण ५३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी ४६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. चार जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव आलेल्या तीन जणांमध्ये भीमनगर बारामती येथील तीस वर्षाची महिला, पतंग शहानगर येथील २५ वर्षाचा युवक व निरावागज येथील पन्नास वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या १२७ झाली असून त्यापैकी ६२ रुग्ण बरे झालेले आहेत व ५४ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण अकरा मृत्यू झालेले आहेत.