महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आज 16 मे 2021 – खासदार राजीव सातव यांचे आज निधन झाले… 6 वर्षांपूर्वी 16 व्या लोकसभेला 16 मे 2015 रोजी एक वर्ष पूर्ण झाले असता, याच दिवशी संपूर्ण देशातील 545 खासदारांमधून 7 खासदार अव्वल ठरले… त्यापैकी महाराष्ट्रातील 6 खासदार अव्वल ठरले होते… त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघातील तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्वाधिक प्रश्न विचारून प्रथम क्रमांकाचे अव्वल खासदार ठरले होते. त्यांच्या पाठोपाठ अनुक्रमे खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धर्मेंद्र यादव ( UP ), खासदार राजीव सातव यांचा समावेश होता. या घटनेला आज 16 मे त्यांच्या निधनाच्या दिवशी 6 वर्षे पूर्ण झाली… त्यावेळी मी लोकमत दैनिकात बातमीसाठी पाठविलेला मेल केल्याचे मला आठवले, आणि तो सर्च करून काढला…
सन 2009 साली राजीव सातव प्रथमच आमदार म्हणून निवडून आले, आणि खेड तालुका युवक काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी ते चाकणला आले. 12 वर्षांपूर्वी चाकण येथे वसुंधरा मंगल कार्यालयात काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती…
यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने संपर्क बालग्राम या अनाथाश्रमासाठी 51 हजाराचा धनादेश सातव यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, तालुकाध्यक्ष भास्कर तुळवे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल पवार, उपाध्यक्ष ॲड. सोमनाथ दौंडकर, सुभाष गाढवे, विनायक लवंगे, श्री. चौधरी, संपर्क बालग्रामचे ए. के. गांगुली उपस्थित होते. ही चाकणकरांसाठी अखेरची भेट ठरली…
स्वर्गीय राजीवजी सातव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली….
— हनुमंत देवकर ( पत्रकार )
————————————
. ● सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा एक खराखुरा कॉंग्रेसमन आपण गमावला : ॲड. सोमनाथ म. दौंडकर
राजीव सातव यांची शेवटची भेट ही काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा सांत्वनपर भेटीसाठी आले असताना झाली. लॉकडाऊन काळात हिंगोली, नांदेड व मराठवाडा परिसरातील चाकण परिसरात काम करणाऱ्या कामगार बांधवांना मदत करण्यासाठी राजीव भाऊंनी अनेकवेळा फोन केले होते व माझे काम बघून कोरोना संकट संपल्यावर समक्ष भेट घेऊन सत्कार करणार असल्याचे म्हणाले होते. राजीव सातव यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ते राष्ट्रीय अध्यक्ष तसेच आमदार, खासदार ते राज्यसभा खासदार व ऑल इंडिया काँग्रेसचे सरचिटणीस व गुजरात प्रभारी म्हणून आम्ही एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जवळून पाहिला आहे. सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा एक खराखुरा कॉंग्रेसमन आपण गमावला. राजीव सातव साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली….
– ॲड. सोमनाथ म. दौंडकर (अध्यक्ष, पुणे जिल्हा युवक काँग्रेस)
———————————————–
बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.