महाबुलेटी न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : स्वतःच्या रानातील शेतमजूराच्या अल्पवयीन मुलीचा
विनयभंग करणा-या शेटफळ हवेली (ता.इंदापूर) येथील धनदांडग्या इसमाविरुध्द गुन्हा दाखल होवून दहा दिवस उलटून गेले तरी त्यास अटक होत नसल्याच्या प्रकाराविरुध्द मातंग एकता आंदोलन, दलित महासंघ व रिपब्लिकन क्रांती सेना या संघटनांनी आवाज उठवला आहे.
प्रा.बाळासाहेब लोखंडे, नारायण ढावरे, प्रकाश आरडे, छगन गायकवाड, दत्तु गायकवाड या संघटनांच्या पदाधिका-यांनी
बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे या संदर्भात निवेदन सादर केले आहे. आरोपीला तात्काळ अटक व्हावी. त्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी. पिडित मुलीला संरक्षण मिळावे. तिचे पूनर्वसन व्हावे, अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सुनील उर्फ बापू वसंत बोडके (रा.शेटफळ हवेली, ता.इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या रानात शेतमजूर म्हणून काम करणा-या मागासवर्गीय समाजाच्या दांपत्याच्या बारा वर्षे वयाच्या मुलीचा दि.१६ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिच्याच घरात जावून विनयभंग केल्याचा बोडकेवर आरोप आहे. दि.२० सप्टेंबर रोजी बावडा पोलीसांकडे फिर्याद नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे ३(१), डब्ल्यू (१), शस्त्र अधिनियम १९५९ चे ३, २५ व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल होवून देखील आरोपीला अटक करण्यात आली नाही. तो उजळमाथ्याने गावात फिरत आहे, असा संघटनांच्या पदाधिका-यांचा आक्षेप आहे.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.