यशोगाथा

बालदिन विशेष : दहा वर्षाचा चिमुकला करतोय प्रवचन, कीर्तन कोरोना काळात गिरवले अध्यात्माचे धडे, हभप. चैतन्य भरतमहाराज थोरात यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृतवर प्रभुत्व, तरुण पिढीला करताहेत व्यसनमुक्ती आणि पर्यावरणावर प्रबोधन…

बालदिन विशेष : दहा वर्षाचा चिमुकला करतोय प्रवचन, कीर्तन
कोरोना काळात गिरवले अध्यात्माचे धडे,
हभप. चैतन्य भरतमहाराज थोरात यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी संस्कृतवर प्रभुत्व, तरुण पिढीला करताहेत व्यसनमुक्ती आणि पर्यावरणावर प्रबोधन

महाबुलेटीन न्यूज

राजगुरूनगर : कोरोनाच्या महामारीत अख्ख जग थांबलं, शाळाही बंद पडल्या मग करायचं काय? मात्र खेड तालुक्यातील चैतन्य या दहावर्षाच्या चिमुकल्या बालकाने कोरोना काळात ऑनलाईन शाळा शिकत असताना चक्क प्रवचन कीर्तनाचे धडे गिरवले. अध्यात्माचे धडे गिरवताना मराठी, हिंदी, इंग्रजी संस्कृतवर प्रभुत्व मिळवून कोरोना काळात पहिले प्रवचन आजोबाच्या दशक्रियेत केले.

पुणे जिल्हातील खेड तालुक्यात चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे वडील हभप. भरतमहाराज थोरात हे महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाबरोबरच वास्तववादी, सत्यशोधक विज्ञाननिष्ठ संत विचार पोहचवणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार. घरात परंपरेने भगवद भक्तीचा वारसा असल्याने बाल वयात शेकडो कीर्तन त्याने श्रवण केली. त्याच्यामध्ये असणारी आध्यात्मिक ओढ कोरोनाच्या महामारीत मोठी संधी ठरली. अवघं जग थांबलं, शाळाही बंद, मग काय याच सुवर्णसंधीचा फायदा चैतन्यने घेतला.

श्रीमद् भगवतगीता, गाथा, ज्ञानेश्वरी अमृतानुभव पंचीकरण, रामचरीतमानस, अद्वैत सिद्धी, अपरोक्षानुभुती, शांकरभाष्य अशा अनेक धर्मग्रंथांचे चिकित्सक बुद्धीने अध्ययन करून, त्यात तो पारंगत झाला. महाराष्ट्रातील असंख्य प्रतिभासंपन्न वेदशास्त्र संपन्न गुरुजनांचे मार्गदर्शन आशिर्वाद त्याला मिळाले. वयाच्या अवध्या दहाव्या वर्षीच त्याने नगर, नांदेड, लातूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रात सर्वदूर अनेक प्रवचन, किर्तन, अत्यंत विद्वत प्रचुरतेने केली. चैतन्यमहाराज आजच्या तरुण पिढीला व्यसनमुक्ती आणि पर्यावरणावर प्रबोधन करीत आहेत.

अवघा ११ वर्षांचा चैतन्य सध्या राजगुरूनगर येथील लिटील चॅम्प इंग्लिश मिडीअम स्कुलमध्ये शिकत असून मराठी, संस्कृत, इंग्रजी माध्यमाबरोबर न्यायशास्त्र, तर्कशास्त्र तसेच जर्मन, फ्रेंच या जागतिक भाषेचा देखिल अभ्यास करून, वैदीक संतविचार जगभरात पोहचवण्याचा त्याचा मानस आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.