महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पक्षीय राजकारण, सहकार क्षेत्रातील जुन्या पिढीतील नेतृत्व बाळासाहेब शेटे यांचे आज ( दि. २५ जून ) निधन झाले. माजी आमदार स्व. नारायणराव पवार, माजी आमदार स्व. साहेबराव सातकर आणि विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्वाची भूमिका बाळासाहेब शेटे यांनी निभावली.
माजी पंचायत समिती सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन, रोलेक्स इंजिनियरिंगचे संस्थापक अशी एकूण बाळासाहेबांची कारकीर्द. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणारे जेष्ठ मार्गदर्शक स्व. बाळासाहेब महादेव शेटे (आण्णा) यांचे आज सकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले.
चासकमान धरणाच्या पाण्याने विस्थापित व्हावे लागल्यानंतर त्यांनी वाडा गाव नियोजनबद्ध बसवले. ज्या ज्यावेळी वाडा गावचा उल्लेख यायचा त्यावेळी बाळासाहेब शेटे, काळूराम सुपे या जोडगोळीचे नाव प्रथम घेतले जाई. मितभाषी असणारे बाळासाहेब शेटे जोपर्यंत सक्रिय राजकारणात होते, तोपर्यंत पश्चिम खेड तालुक्यावरील पकड त्यांनी कायम ठेवली होती. उद्योजक चंद्रशेखर शेटे यांचे ते वडील होत.
०००००
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.