महाबुलेटीन न्यूज पुणे :
ह्या माणसांचं काही म्हणजे काहीचं नॉर्मल नव्हतं … सगळं कसं एकदम निराळं आणि वर्ल्ड क्लास…प्रत्येकाला आपल्याकडे हे धोनीसारखंच काही ना काही तरी किमान असावं असं वाटणारं…
अफाट वेगाने धोनी भारतीयांसमोर अवतरला तेव्हा सुद्धा हा निराळाच होता…आणि आज लाखो काय जगभरातल्या करोडो अब्जावधी लोकांना वेडं करून आला तसच अचानक हा निश:ब्द करून रिटायर झाला…शांतपणे….त्याच्या व्यक्तित्वाप्रमाणेच…..तेव्हा सुद्धा हा वेगळाचं आहे…निराळाच आहे…
महेंद्रसिंग धोनी आला तेव्हा त्याची रूलबुक्समध्ये नसलेली पण चित्त्याच्या वेगाने झेपावणारी अफाट विकेट किपींग… त्याची वेगळीच पण त्याला शोभून दिसणारी हेअर स्टाईल… कदाचित शास्त्रोक्त नसलेली पण तरीही मोक्याच्या क्षणी विजय मिळवून देणारी आणि प्रतिस्पर्ध्याच्या काळजाचा ठोका शब्दश: बंद पाडणारी तुफान, बेबंद, हुकमी फटकेबाजी, त्याचा तो जबरदस्त हुकमी, कष्टसाध्य आणि ताकतवान हेलिकॉप्टर शॉट… प्रचंड कष्टाने आणि शिस्तीने मिळवलेला त्याचा स्वतःचा जबरदस्त फिटनेस आणि त्याने संघात सगळ्यांना शिस्तीत लावलेली फिटनेसची गोडी…भल्याभल्यांना गोंधळून लावणारा त्याचा विलक्षण वेगवान आणि बिनचूक क्रिकेटिंग सेन्स… वाट्टेल त्या वाईट काळात आणि गदारोळात सुद्धा डोकं शांत ठेवायची त्याची अदभूत क्षमता…
सामना आता हातातून गेला गेला असं दुनियेला वाटताना सुद्धा शेवटपर्यंत एक दोन धावा करत करत धावफलक हलता ठेऊन बरोब्बर शेवटी शेवटी स्वतःला पाहिजे नेमके तेव्हा आपले गिअर्स चेंज करून सामना खिशात टाकायची त्याची अफलातून पृव्हन हातोटी….
डीआरएस रिव्ह्यू घेताना अनेक वेळा दिसलेला त्याचा प्रचंड बुद्धिमान स्मार्टनेस… अवघड परिस्थिती मध्ये सुद्धा शांतपणे आपल्या गोलंदाजांकडून नेमकी अचूक गोलंदाजी करवून सामना आपल्या बाजूला झुकवणारं त्याचं टेम्परामेंट…
त्याची अफाट डोकेबाज कॅप्टन्सी… ती करताना वेळोवेळी त्याने घेतलेले धाडसी पण बिनचूक निर्णय… कदाचित अपयशी ठरणाऱ्या सहकार्यांवर त्याने योग्यवेळी दाखवलेला सार्थ विश्वास आणि यामुळेच त्या सहकाऱ्यांनी धोनीच्या या मदतीने स्वतःचा उंचावलेला नेमका आलेख…भारतीय लष्कराने धोनीला दिलेली मानद पदवी आणि भारतीय सैनिकांसाठी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन धोनीने केलेलं काम….
….आणि या सोबतच कसोटी क्रिकेटमधून रिटायर होताना या महान फलंदाजाने, महान यष्टीरक्षकाने, महान क्षेत्ररक्षकाने, महान कर्णधाराने आणि मुळात महान क्रिकेटीअरने अवलंबलेली पद्धत… आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताना धोनीने निवडलेली पद्धत…
प्रत्येक गोष्ट वेगळीचं….शांतपणे विचार करून केलेली तरीही अबोव्ह नॉर्मल…..
….आणि म्हणूनचं आज जेव्हा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून रिटायर झाला तेव्हा जगभरातल्या अब्जावधी क्रिकेट रसिकांच्या हृदयात धस्स झालं असणार आहे….झालं आहे,
धोनीवर नितांत प्रेम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज आजीमाजी क्रिकेट खेळाडूंनी आज धोनीला मानवंदना देणारे ट्वीटस केले आहेत…. हा धोनीच्या दिलदार कर्तृत्वाचा परिणाम
यापुढे आता ‘DHONI’ असे पाठीवर लिहिलेला टीशर्ट डगआउट मध्ये बसून संघाला चीअरअप करणार नाही, संघासाठी डावपेच आखणार नाही , संघासाठी प्रतिस्पर्धी संघाला बुचकळ्यात टाकेल असे हुकमी धडाकेबाज निर्णय घेणार नाही, संघ अडचणीत असताना प्रचंड आत्मविश्वासाने भारून जाऊन देशासाठी मैदानात उतरणार नाही, शांतपणे फलंदाजी करत एक एक रन जोडत आणि शेवटच्या हुकमी विश्वसनीय फलंदाजीने संघाला आणि देशालाही जिंकवणार नाही…
…..आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ,”धोनी यायचा आहे यार अजून” हा आश्वस्त विचार आपल्या मनात आता कधी येणार नाही….
यालाच म्हणायचं…”धोनी नावाचं विलक्षण गारुड”…जे आपल्या मनावर गेली तब्बल सतरा वर्षे घुमलं आणि आता सतरा वर्षांनी आपल्याला हजारो लाखो क्षणांचा अवर्णनीय असा अपरिमित आनंद देऊन आज शांतपणे स्थिरावलं….
आमची सर्वांची मानवंदना या धोनी नावाचं अफाट गारुडाला……
अण्णा थोरात, प्रेसिडेंट
अनिल वाल्हेकर, पार्थ वाल्हेकर,
सुरज थोरात, अमोल माने….
“क्रिकेट मास्टर्स अकॅडमी, पुणे”
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.