महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती खेड यांच्यामार्फत चालविण्यात येणारे “म्हाडा गृहनिर्माण सोसायटी म्हाळुंगे इंगळे कोविड सेंटर येथे अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती तसेच CRIME INVESTIGATION OF AGENCY (CIA) NATIONAL ORGANISATION FIGHT AGAINST OF CURRUPTION यांच्या वतीने तेथे जाऊन डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी प्रवर्ग यांना भेट देऊन “कोरोना योद्धा” प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
म्हाडा गृहनिर्माण सोसायटी, म्हाळुंगे इंगळे येथे असणारे कोविड सेंटर येथे सुमारे ८९०१ रुग्ण आढळून आले पण त्यातले वैशिष्ट्य म्हणजे एकही रुग्णाचा जीव न गमावता कोविड सेंटरला यश प्राप्त झाले आहे.
समाजात सगळीकडे कोरोनाच्या भीतीचे वातावरण असताना सुद्धा म्हाळुंगे इंगळे येथे कोविड सेंटर सुरू करण्याचे धाडस केले. हा काळ खरं तर खूप कसोटीचा काळ होता. डॉक्टरी पेशाचा कस पाहणारा हा काळ होता, याच काळात या कोविड सेंटरने अनेक रुग्णाचे प्राण वाचवून डॉक्टरी पेशाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला आहे.
अनेक रुग्णांचे कोरोना काळात बरे होऊन घरी जाताना डोळे अश्रूंनी डबडबले, अनेकांनी अक्षरशः डॉक्टरांचे पाय धरले. यावरून डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते किती घट्ट झाले होते हे समजते. कोविड सेंटर मध्ये डॉक्टर्स, नर्सेस यांनी मोलाचे कार्य केले आहे.
समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण प्रल्हाद देवरे, पुणे महिला अध्यक्षा मोहिनीताई राक्षे, पुणे जिल्हा सचिव नितीन सैद, संपर्क प्रमुख मंगलताई शेवकरी, खेड युवा तालुका अध्यक्ष अभिजीत भवार, तालुका अध्यक्ष शैलेश साळुंके, चाकण उपाध्यक्ष धनराज गायकवाड आदींचे मोलाचे सहकार्य या समितीला लाभले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.