महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : ॲबॅकस ही गणिताची एक वेगळी परिभाषा म्हणून गणली जाते. परंतु लोकांपर्यंत त्याचे महत्त्व पाहिजे तितके पोहोचलेले नाही. सन २०१६ पासून राजगुरूनगर ( ता. खेड ) येथील हुतात्मा राजगुरू अकादमी संचालित स्मार्ट कीड ॲबॅकस क्लासेस ही संस्था दरवर्षी आपल्या परीने आपले विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस परीक्षेमध्ये या क्लासेसच्या ४ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये सुवर्णपदक पटकावून तालुक्याचे व अकादमीचे नाव विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले आहे.
अकादमीच्या साहिल जगदीश बल्लाळ, प्रगती इंद्रजीत मांजरे, अनन्या सतीश देवरे, आराध्या सतीश देवरे या ४ विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याने त्यांच्या सन्मानार्थ नुकताच बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस सहाय्यक निरीक्षक अशोक टोके, छावा संघटना महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली मालकर, नितीन गारगोटे, होलेवाडी गावचे पोलीस पाटील संतोष होले यांसह क्लासचे अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲबॅकस क्लासच्या शुभांगी बल्लाळ, सूत्रसंचालन सतीश देवरे यांनी केले. तर अकादमीचे संस्थापक जगदीश बल्लाळ यांनी सर्वांचे आभार मानले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.