गुन्हेगारी

अनंत ग्रामीण पतसंस्थेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा…अडीच लाखाची रोकड लंपास, दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला गोळी घालुन केले ठार..

अनंत ग्रामीण पतसंस्थेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा…अडीच लाखाची रोकड लंपास,
दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला गोळी घालुन केले ठार..

महाबुलेटीन न्यूज
जुन्नर । आनंद कांबळे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील वडगाव कांदळी येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज ( दिनांक 24 नोव्हेंबर ) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी शस्त्र हातात घेऊन दरोडा टाकला. या दरोड्यात दोन लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बँकेत व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते.

दरम्यान दोन दरोडेखोर हातात पिस्तुल घेऊन धमकावत असताना व्यवस्थापक दशरथ भोर यांनी विरोध केला असता त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक दशरथ भोर यांचा जागीच मृत्यु झाला. नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.