महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : रेखा आणि अमिताभ बच्चन या दोन्ही कलाकारांची नावे जेव्हा एकत्र घेतली जातात तेव्हा त्यांच्या अर्धवट लव्हस्टोरीची आठवण नेहमी येत असते. रेखा आणि अमिताभमध्ये जवळीकता होती, हे सगळ्यांनाच माहित आहे. आज ते दोघे एकत्र नाहीत. पण आजही या दोघांमध्ये एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना माहित नाही.
रेखा अनेकदा तिच्या भांगेत कुंकू लावताना दिसून येते. त्यामुळे ती नक्की कोणाच्या नावाचे कुंकू लावते हा प्रश्न उपस्थित होतो. रेखाला काही लोकांनी हा प्रश्न विचारला. पण तिने नेहमीच हुशारीने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. अनेक वेळा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की, ती ज्या शहरातून येते तिथे कुंकू लावणे फॅशनचा भाग आहे.
रेखाने कधी तिच्या भांगेतील कुंकूची खासियत स्वत:हून सांगितली नसली तरी अभिनेता पुनीत इस्सरची पत्नी दीपालीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. पुनीत इस्सरची पत्नी दीपालीने सांगितले की, रेखा आपल्या भांगेत अभिनेता अमिताभ बच्चनच्या नावाचे कुंकू लावते. दीपालीच्या या दाव्यावर रेखाने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
‘ कुली’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका अॅक्शन सीनमध्ये अमिताभच्या पोटावर चुकून पुनीत इस्सरचा बुक्का लागला होता. या घटनेचा परिणाम असा झाला की, महानायक अमिताभ बच्चन जिथे मरता मरता वाचले होते. तिथेच पुनीतचे करिअर सुरू होऊन संपुष्टात गेले. पुनीतला दूरदर्शनवरील महाभारत मालिके मधील दुर्योधन या पात्रामुळे लोकप्रियता मिळाली. दुर्योधन या पात्राला पुनीतने वेगळ्याच उंचावर नेऊन ठेवले की, या पात्रामुळे तो घरा-घरात ओळखला जाऊ लागला.
——
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.