पुणे जिल्हा

अमीन खान यांना बेस्ट ज्युरी पुरस्कार

खान यांना बेस्ट ज्युरी पुरस्कार

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या युवा संसद स्पर्धेच्या राज्यस्तरीय ज्युरी कमिटीत उत्कृष्ट ज्युरी म्हणून काम केल्याबद्दल पत्रकार अमीन खान यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी शुक्रवारी (२६ मार्च) पुरस्काराच्या २० हजार रुपये रकमेचा धनादेश खान यांना सुपूर्त केला.

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेच्या सभागृहात नेहरू युवा केंद्र संघटन राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय यांच्यातर्फे ४ जानेवारी २०२१ रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय युवा संसद अभियानातंर्गत युवा वक्तृत्व स्पर्धेत ज्युरी पॅनलवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून अमीन खान यांनी केलेल्या कामाची दखल संयोजन समितीने घेतली. त्यानुसार प्रमाणपत्र आणि धनादेश त्यांना सुपूर्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत संसदेच्या सेंन्ट्रल हॉल मध्ये १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा संसद संपन्न झाली.

वडगाव मावळ येथे तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत या पुरस्काराबद्दल अमीन खान यांचा सत्कार मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शनिवारी (ता.२७) करण्यात आला. यावेळी बडवे इंजिनिअरिंग कंपनीच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, पतसंस्थेच्या अध्यक्षा तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, पंढरीनाथ ढोरे, ज्योती बधाले, सुमित्रा दौंडकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

53 minutes ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

54 minutes ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.