पुणे जिल्हा

खेडच्या शिवसेना शिष्टमंडळाने गोरे कुटुंबियासोबत घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट… ● खेड पंचायत समितीच्या जागेबद्दल केली तक्रार…

खेडच्या शिवसेना शिष्टमंडळाने गोरे कुटुंबियासोबत घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
खेड पंचायत समितीच्या जागेबद्दल केली तक्रार

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : शिवसेना शिष्टमंडळ व खेड विधानसभेचे माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत आज मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची मागणी केली. यावेळी खेड पंचायत समितीची मंजूर प्रशासकीय इमारतीची जागा बेकायदेशीर पद्धतीने जिल्हा परिषदेने महसूल विभागाला दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून आजवरच्या सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती देण्यात आली.

यावेळी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, स्व. मा. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषाताई गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती अरगडे, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, केशव अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 01 Nov 2026

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वाहतूक…

10 hours ago

MahaBulletin — 31 Oct 2026

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

1 day ago

MahaBulletin — 30 Oct 2026

गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

2 days ago

MahaBulletin — 29 Oct 2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 27 Oct 2026

सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

5 days ago

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

6 days ago

This website uses cookies.