सामाजिक

आंबेगाव तालुक्यात आखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : कोविड १९ सारख्या महाभयंकर कोरोना या महामारीच्या काळात आपले कर्तव्य व जबाबदारी अतिशय निष्ठापुर्वक पार पाडलेल्या आंबेगांव तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गाला कोविड-१९ समाजरक्षक विषेश सन्मान २०२० हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक पदाधिकारी वैभव मंडलिक यांनी दिली.
आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी, घोडेगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, घोडेगांव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.प्रताप चिंचोलीकर यांना आखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्यविषयक माहिती तथा सेवा व सुरक्षा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच या कार्यकाळात सदैव तत्परतेने कार्यरत राहिल्याबद्दल हे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले.
 याप्रसंगी आखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे राज्य अध्यक्ष शशिकांत डोके, महिला राज्य अध्यक्ष प्रिया शिंगोटे यांचेकडुन सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्रीकांत गाढवे, सुरेश घोडेकर यावेळी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

1 day ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

2 days ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

4 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

1 week ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 week ago

This website uses cookies.