महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या दोन युवकांवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये दि. २२ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या गुन्हयामधील आरोपी तुषार प्रभाकर जाधव वय १९ वर्ष या युवकाने त्याचा मित्र साईप्रसाद हनुमंत देवाडे वय १९ वर्ष याच्या सहाय्याने फूस लावून पळवून नेले होते.
या घटनेमधील अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात नारायणगाव पोलीस स्थानकातील पोलीसांना यश आले असून या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे व तिचा विनयभंग करून तिला फूस लावून पळवून नेणे अशा गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार भा. द. वि. कलम ३५४ (ए) (डी) सह कलम ८, १२ पोस्को कायदया अंतर्गत यातील आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपींना पोलीसांनी खेड सत्र न्यायालयात हजर केले असता. खेड सत्र न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.