महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव (किरण वाजगे) : निमगावसावा व १४ नंबर येथे दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला नारायणगाव पोलिसांनी सोमवार दिनांक १५ रोजी ताब्यात घेतले. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, निमगाव सावा व १४ नंबर या गावांमध्ये संशयित रीत्या फिरत असलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या पाच दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
नारायणगाव पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरल्या बाबतची माहिती समजली. त्यानुसार निमगाव सावा येथील एका चौकामध्ये दयानंद (नाव बदलले आहे) या अल्पवयीन मुलाला नारायणगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला नारायणगाव पोलिस स्थानकात नाव व पत्ता विचारण्यासाठी आणले. यावेळी त्याने निमगाव सावा व परिसरातून मोटर सायकल व मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या पाच मोटरसायकल व ३ चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक संतोष दुपारगुडे, धनंजय पालवे, भीमा लोंढे, दिनेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल, शैलेश वाघमारे, सत्यम केळकर, अनिल तांबे व होमगार्ड अक्षय मुळे यांनी केली.
—————–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.