महाबुलेटीन न्यूज । नाजीम इनामदार
राजगुरूनगर : रागाच्या भरात अल्पवयीन मुलाकडून बापाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील पुर्व भागातील दावडी गावच्या हद्दीत घडली. वडील दारू पिऊन सतत शिवीगाळ व मारहाण करत असल्याच्या कारणावरुन सोळा वर्षीय मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी घण घालून खुन केल्याची घटना घडली आहे.
संतोष वाघिरे ( वय ४३, रा. कान्हुरकरमळा, चिंचोशी रोड, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली आहे. हि घटना मंगळवारी ( दि. १० ऑगस्ट ) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावडी गावचे हद्दीत कान्हुरमळा, चिंचोशी रोड, येथे मयत संतोष वाघिरे व त्यांचा १६ वर्षीय लहान मुलगा राहत होते. त्यांचा म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे. वडिल संजय वाघिरे हे रोज दाऊ पिऊन १६ वर्षीय मुलाला शिवीगाळ व मारहाण करून काम करण्यास लावत होते. दि. १० रोजी मयत संजय वाघिरे १६ वर्षीय मुलाला दिवसभर शिवीगाळ व मारहाण करून त्याला दिवसभर जेवायला व रात्री गोठयामध्ये अंथरूण पांघरून न देता झोपायला लावले. या कारणावरून मुलाला राग आल्याने गोठयातील लोखंडी घणाने वडील संतोष वाघिरे यांचे डोक्यात घाव घालुन खुन केला केला.
याबाबत मोठा भाऊ आदिनाथ संतोश वाघिरे (वय २०, रा. कान्हुरमळा, चिंचोशी रोड, दावडी, ता. खेड ) यांनी लहान भावाच्या विरोधात वडीलांचा खून केल्याबद्दल फिर्याद दिली आहे. घटनास्थळी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव, उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन गिलबिले यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करित आहे.
००००
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.