महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव (किरण वाजगे) : आळेफाटा पोलिसांनी दबंग कारवाई करत पिंपळवंडी (ता. जुन्नर) गावच्या बस स्टॅन्ड परिसरामध्ये दोन ठिकाणी अवैध दारू साठ्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये एका ठिकाणाहून ९२ हजार रुपयांचा तर दुसऱ्या ठिकाणाहून ५२ हजार रुपयांचा असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या साठ्यामध्ये ऑफिसर चॉईस, रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर 1, इम्पेरियल ब्ल्यू, जी. एम., डॉक्टर ब्रांडी, डी. एस. पी. ब्लॅक, रॉयल चॅलेंज असे देशी-विदेशी दारू चे एकूण ४२ बॉक्स तसेच २५ हजार रुपयांचे साहित्य असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एकूण ३ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.
ही कामगिरी आळेफाटा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहायक फौजदार सतीश घाडगे, पो.ना. नारायण बर्डे, पो.नाईक. नरेंद्र गोराणे, पो. शिपाई गोविंद केंद्रे, किशोर कोरडे, निलेश करे, दीपक गर्जे, मोहन आनंदगावकर, मुरूमकर, वैद्य, सचिन डामसे, किशोर कुलकर्णी, महिला पो. शिपाई ज्योती दहिफळे, वैद्य, तडवी, मुरूमकर यांनी केली आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.