महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश येथील एका धार्मिक पुण्यतिथीचे कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा व मास्क वापरण्याचे वेळोवेळी आवाहन करावे लागल्याने गर्दी कमी करण्याचे उपाय योजनेचा अभाव कायम राहत पोलीस आयुक्तांचा आळंदीत सत्कार प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.
आळंदीत पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आळंदीत भेट दिली. यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश व आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांचा ह.भ.प. विठ्ठल महाराज घुले यांचे पुण्यतिथीचे निमित्त साधून वारकरी साधकांचे वतीने पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. .
आळंदीतील विनाशुल्क, विनावेतन वारकरी शिक्षण देणारी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज संचालित या संस्थेचे अध्यापक गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले उर्फ बाबा यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त येथील ज्ञानदर्शन सभागृहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी भजनाचा आस्वाद घेतला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सचिव बाजीराव नाना चंदिले, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजाभाऊ चोपदार, जालिंदर महाराज भोसले, वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी साधक, आळंदी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष सचिन गिलबिले, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, डी. डी. भोसले पाटील यांचेसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.