कोरोना

आळंदी एमआयटीत १०० बेडचे कोविड केअर सेंटर,आळंदी पंचक्रोशीतील रुग्णांसाथी सुविधा

महाबुलेटीन नेटवर्क / अर्जुन मेदनकर
आळंदी : येथील शैक्षणिक वैभव असलेल्या आळंदी एमआयटीत १०० बेडचे कोविड केअर सेंटर येत्या चार ते पाच दिवसांत सर्व सोयीनी सुसज्ज तयार केले जाणार असून आळंदी पंचक्रोशीतील कोरोंना बाधित रुग्णांची प्रशस्त जागेत सोय होणार असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जी. जाधव यांनी दिली.
आळंदी पंचक्रोशीत कोरोंनाचे रुग्ण वाढत असून आळंदी जवळच रुग्णाचे आरोग्याची दक्षता घेणारी सोय व्हावी यासाठी येथील एमआयटी महाविद्यालयाचे प्रशस्त जागेत कोविड केअर सेंटर सुमारे १०० बेडचे तयार केले जात आहे. लवकरच आळंदी पंचक्रोशीतील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालय ३० बेडचे असून येथे ऑक्सीजन पाईप लाईनचे काम देखील करण्यात येत आहे. यामुळे गरजू रुग्णांची सोय स्थानिक ठिकाणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आळंदी नगरपरिषदेसह या परिसरातील गावांतील रुग्णांची आरोग्य विषयक सोय शासनाचे मार्गदर्शक धोरणानुसार केली जाणार आहे. यासाठी आळंदी परिसरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा देखील अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली. यात सुसंवाद साधण्यात आल्याचे डॉक्टर जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी- च-होली डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष विकास पाटील, अंबालाल पाटील यांचेसह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते. उपस्थितांनी संवाद साधत अडचणी मांडल्या. यावर उपाययोजना तसेच दक्षता घेण्याची ग्वाही देण्यात आली.
आळंदी नगरपरिषद,आळंदी ग्रामीण रुग्णालय,आळंदी- च-होली डॉक्टर्स फोरम, आळंदी महसूल व आळंदी पोलिस प्रशासन तसेच पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आपआपल्या परीने आळंदी कोरोनमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. आळंदीसह पंचक्रोशी कोरोंनामुक्त व्हावी यासाठी नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, सार्वजनिक व गर्दीचे ठिकाणी कायम मास्क वापरावा, प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन आळंदी शहर अॅटी कोरोना टास्क फोर्सच्या वतीने समन्वयक अर्जुन मेदनकर यांनी केले आहे.
आळंदीत बुधवार ( दि.२२ ) चार रुग्ण वाढले आहेत. यात एक महीला व तीन पुरुष रुग्ण आहेत. वडगाव रस्ता, माऊली  मंदीर परीसर, देहु फाटा व प्रदक्षणा रस्त्या लगत या भागातील  रुग्ण आहेत. त्यामुळे येथील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता ४४ झाली असून ३० रुग्ण बारे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

3 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

6 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

6 days ago

This website uses cookies.