सामाजिक

वासुली फाटा येथे पोलीस चौकी उभारल्यास खेड मध्ये पश्चिम भागाला न्याय मिळेल

# ‘माझा गाव, माझी जबाबदारी’ हा विचार घेऊन नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांची आपल्या भागासाठी पोलीस चौकीची मागणी
महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
चाकण : एमआयडीसी फेज २ मधील वासुली फाटा येथे पोलीस चौकी उभारण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस स्टेशन अंकित म्हाळुंगे पोलिस चौकीच्या अंतर्गत असणाऱ्या चाकण टप्पा क्र.२ हा भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने व्यापलेला आहे या भागात मोठी औद्योगिक वसाहत तसेच अनेक कंपन्या मध्ये काम करणारे कामगार या भागात आपले जीवन जगत आहेत.
खरे पाहता या भागाची व्याप्ती खूप मोठी आहे सहा गावे मिळून चाकण टप्पा क्र.२ उभारला आहे यातच म्हाळुंगे पोलिस चौकीची व्याप्ती खूप असल्याने या सर्व गावांच्या मध्यभागी वासुली फाटा या ठिकाणी बाजार पेठ भरते, तेथे पोलिस चौकी उभारणे गरजेचे आहे
या भागातून जाताना शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी वर्ग, महिला तसेच बाहेरून आलेला कामगार वर्ग यांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येतो, याचा फायदा घेत काही गुंड, लुटारू, चोर इ. स्थानिकांना त्रास देतात. यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ होत आहे आणि यातूनच मोठे गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण होत आहे, म्हणून पोलीस चौकी उभारली तर निश्चितच या बाबींवर आळा बसेल.
वासुली फाटा या ठिकाणी जर नव्याने पोलिस चौकी उभारण्यात आली तर साहजिकच शिंदे, वासुली, वराळे, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे, शेलु, आसखेड, करंजविहिरे, शिवे आणि पश्चिम भागातील सर्व गावांसाठी महत्वाचे ठिकाण म्हणजे सध्याची सर्वात मोठी बाजारपेठ वासुली फाटा आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, ग्रामस्थ व गावकरी बांधव यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना पोलीस चौकी जवळ उपलब्ध होईल आणि पोलिसांना सुद्धा त्यांचे काम करण्यास सोयीस्कर होणार आहे. पूर्वी चाकण येथे जावे लागायचे तर सध्या म्हाळुंगे येथे ग्रामस्थांना जावे लागते, त्यामुळे या भागाचा कायमचा प्रश्न सुटणार आहे, म्हणून वासुली फाटा या ठिकाणी नव्याने पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

24 hours ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

4 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

7 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

This website uses cookies.