महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : येथील आळंदी मरकळ रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असुन रस्ते विकास साधुन दुरावस्था दुर करण्याचे काम तात्काळ पूर्ण न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा मनसेचे नेत अविनाश लोखंडे यांनी दिला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर दर्शनास राज्य परीसरातुन भाविक येत असतात. मात्र आळंदीला जोडणा-या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यात आळंदी ते छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूरला जोडणारा रस्ता आळंदी मरकळ रोडवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून खड्याचे प्रमाण वाढले आहे. खड्डे असल्याने वाहने चालविणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचे होते. या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी न लागल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे रस्ता साधन सुविधा आणि आस्थपणा विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांनी पुणे जिल्हा बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन दिला आहे. यावेळी अभय वाडेकर, प्रसाद बोराटे, निलेश घुंडरे, बाळू नेटके, किरण नरके , युवराज चौधरी आदी उपस्थित होते.
आळंदी – मरकळ रोडवर छोटे मोठे औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या रोडवर माल वाहतूक करणाऱ्या गाड्या, कामगार, शेतकरी, भाविक वर्ग मोठ्या प्रमाणावर ये जा करीत असतात रस्त्यावरील खड्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत. रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे डांबरीकरण करून पूर्ण करावा, अशी मागणी अविनाश लोखंडे यांनी केली आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.