महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मुक्ताबाई अंतर्धान समाधी दिन सोहळ्या निमित्त श्रींचे गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली. परंपरेने श्रींची पवमान पूजा, दुधारती, नित्यनैमित्तिक महाप्रसाद आदि कार्यक्रम झाले. श्री मुक्ताई मंदिरात देखील पुष्पसजावट, पूजा आदि धार्मिक करण्यात परंपरेने करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
येथील संत श्री ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी प्रांगणात स्थापित असलेल्या श्री संत कबीर महाराज मठाच्या परंपरेतील ४ थे सत्पुरुष रामदास महाराज यांचे ७६ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त ह.भ.प. बाजीराव नाना महाराज चंदिले यांची कीर्तन सेवा झाली. सद्गुरू महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. संयोजन नीलेश महाराज कबीरबुवा लोंढे यांनी केले.
श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा तापी तिरावर परंपरेने साजरा करण्यात आला. संत मुक्ताबाई समाधी स्थळ कोथळी – मुक्ताईनगर येथे गुलालाचे कीर्तन व पुष्पवृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्याच २५ भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचे गुलालाचे कीर्तन झाले. सलग दुसर्या वर्षी कोरोनामुळे मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत सोहळा झाला. या निमित्त नविन मंदिरात अजाबराव पाटील वरणगाव यांचे वतीने सुरेख आब्यांची आरास करण्यात आली होती.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.