महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ बीव्हिजीच्या या रुग्णवाहिकेत अत्यंत विषारी घोणस सर्पआढळल्याची घटना घडली. यामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिक, रुग्ण यांच्या सुरक्षिततेचाप्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात असलेली १०८ रुग्णवाहिका स्वच्छता करण्याचे काम सुरु असताना वाहन चालक यांचे लक्षात आले कि, रुग्णवाहिकेत घोणस आहे. रुग्णवाहिका नियमित स्वच्छतेचे काम सुरु असताना ही बाब उघड झाली. रुग्णवाहिकेच्या उघड्याखिडकीतून घोणस आत आली असण्याचा यावेळी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घोणस असल्याचे दिसताच सर्प मित्राना बोलवून घोणस एका बरणीत घेऊन वनात सोडण्यात आली असल्याची माहिती आळंदी ग्रामीणरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी दिली. यात कोणालाही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने परिसरस्वच्छता आणि होत असलेली अनधिकृत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर तात्काळ परिसर स्वच्छता आणि वाहनपार्किंग बाबत आळंदी नगरपरिषद प्रशासनास स्वच्छता आणि वाहन पार्किंग बाबत दक्षता घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवे व्यतिरिक्त आळंदी ग्रामीण रुग्णालयात वाहने लावू नयेत, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.