महाबुलेटीन न्यूज
मुंबई : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे इतर राज्यातून ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमहुन महाराष्ट्रात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोंदियात दाखल झाली. या ऑक्सिजनच्या रेल्वेमध्ये ऑक्सिजनचे एकूण साठ कंटेनर आहेत. रेल्वेतून आणण्यात आलेला ऑक्सिजनचा पुरवठा हा नागपूर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी केला जाणार आहे.
राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरचे टँकर या रेल्वेत ठेवण्यात आलेले आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आलेला आहे.
या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्वीड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. या दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर सोमवारपासून महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वेमार्गाने विजाग, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो येथे पाठविण्यात आले. त्यानंतर येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्गाने करण्यात आलेला आहे.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.