महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे ( दि. ७ सप्टेंबर ) : आज आद्य क्रांतीकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी जयंती संपुर्ण महाराष्ट्रामधे साजरी करण्यात आली. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा अगदी साध्या पद्धतीने कार्यक्रम राज्यभरात पार पडत आहे.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सर्वसाधारण शाखेचे प्र.तहसिलदार श्रावण ताते व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खेड तालुक्यात ( राजगुरूनगर ) येथील तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पंचायत समिती, गढई मैदान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाचीवाडी, चाकण पोलीस स्टेशन आदी ठिकाणी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी तहसिलदार सुचित्रा आमले, नायब तहसिलदार राजेश कानसकर, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मंडले, गट विकास अधिकारी अजय जोशी, चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश धस, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख श्री. रामदास धनवटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. भगवान पोखरकर, तसेच एल. बी. तनपुरे, नगरसेवक श्री. महेश शेवकरी, मनोहर गोरगले, कैलास जाधव, आप्पा भंडलकर, राहुल भंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.