महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव यांच्या स्तरावर नवगुरुकुल फाऊंडेशन वेल्फेअर यांच्यामार्फत आंबेगाव तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनींसाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर डिप्लोमा प्रशिक्षण प्रवेश परीक्षेचे आयोजन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा गोहे, आदिवासी ता. आंबेगाव, जि. पुणे येथे करण्यात आले होते.
या प्रशिक्षण प्रवेश परीक्षेसाठी आंबेगाव तालुक्यातील १९७ विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतल्याचे केंद्र संचालक व गोहे आश्रमशाळेचे प्राचार्य किशोर जोगदंड यांनी सांगितले.
सध्या देशभरात नव्हे तर जगभरात कोरोनाचे संकट सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून गोहे येथील शासकीय आश्रमशाळेत ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी आश्रमशाळेतील व वसतिगृहातील १० वी, १२ वी तसेच पदवीधर उत्तीर्ण १९७ विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थिनींना पवनीत कौर (आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे) यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगावचे प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, दीपक कालेकर, केंद्र संचालक म्हणून गोहे आश्रमशाळेचे प्राचार्य किशोर जोगदंड, पी. एन. गायकवाड, पिंपळे सर, गृहपाल व्ही. के. टकले व फुलवडे अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील पोटे यांनी काम पाहिले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.