महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे
जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं ४० वर्षीय तलाठी आणि २० वर्षांची एक कॉलेज तरुणी मृतावस्थेत आढळली आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहे. मृत्यूपूर्वी दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात लावलेली कार आणि त्याच परिसरात आढळलेल्या चपलांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एक तलाठी आणि कॉलेजची तरुणी अशाप्रकारे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असं मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत.
मयत रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. तर रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दोघे मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी रामचंद्र पारधी यांच्या पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, तर रूपालीच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल होता.
दोन वेगवेगळ्या एफआयआरमुळे दोन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस स्वतंत्र्यपणे तपास करत होते. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील दर्गावाडी परिसरातील कोकणकड्याजवळ दोघांचे मृतदेह आढळले आहेत. खरंतर, रिव्हर्स वॉटरफॉलजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची कार आणि कड्याजवळ आढळलेल्या चपलांमुळे संशय बळावला होता. यामुळे रविवारी (22 जून) शोध मोहीम सुरू झाली. मात्र खराब हवामानामुळे शोधमोहीम थांबवावी लागली.
सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने 1200 फूट खोल दरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दोघांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही घातपात घडला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पण आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत संतोष पारधे यांना काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामासाठी पाठवले होते. त्यानंतर ते कामावर येत नव्हते. यानंतर आता त्यांचा एका कॉलेजच्या तरुणीसोबत मृतदेह आढळला आहे. आत्महत्येचं खरं कारण समजले नाही. मात्र अनैतिक संबंधातून दोघांनी आयुष्याचा शेवट केला असावा, असं संशय व्यक्त केला जातोय. जुन्नर पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
This website uses cookies.