पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलताई पानसरे यांचा खेडच्या पूर्व पट्ट्यात दौरा

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी गोसासी, वाकळवाडी, वरूडे गावाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात गोसासी-वाकळवाडी-वरूडे रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
या पाहणी दौऱ्या दरम्यान अँड. तात्यासाहेब पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, माजी उपसभापती दशरथ गाडे पाटील, मा.पं.स. सदस्य ज्ञानेश्वर (माऊली) गोरडे, अँड. सायली व अँड सतिश गोरडे, उपसरपंच संतोष गोरडे, सदस्य रवींद्र गोरडे, अधिकारी अंकुशराव गोरडे, मारुतीशेठ गोरडे, वत्सला प्रभाकर गोरडे, मारुती आप्पा गोरडे , बाबासाहेब गोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निर्मला पानसरे यांनी गोसासी गावातील महिलांच्या कार्याचा गौरव करून गावातील महिलांच्या एकीचे कौतुक केले. तसेच त्यांचे काम अभिमानास्पद असून महिलांचे गावच्या विकासासाठी मोठे योगदान असल्याचे सांगितले. गावातील महिला सुशिक्षित आहेत, त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होत आहेत. नविन पिढी आदर्श होत आहे. गावातील स्व. प्रा. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. गोसासी हे आदर्श गाव असल्याचे सांगून सर्व गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.