महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसीतील कुरुळी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील आळंदी फाट्याजवळ असलेल्या मेटॅलिस्ट फॉर्जिंग ह्या कंपनीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनची पूर्वतयारी करण्यासाठी ध्वजस्तंभाला ऑईल पेंट देताना लोखंडी खांबात विजेचा प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी ( दि. २४ ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील एक कामगार खेड तालुक्यातील नायफड व दुसरा कामगार आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर या आदिवासी पट्ट्यातील आहे. म्हाळुंगे पोलिसांनी मयत नोंद दाखल केली आहे.
विजय ढवळा लोहकरे ( वय २० वर्षे ) व ज्ञानेश्वर रामदास ठोकळ ( वय २६ वर्षे ) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.
दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होऊनही कंपनी प्रशासन कातडीबचाव भूमिका घेत असल्याने दोन्ही तालुक्यातील आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून आज सकाळी साडे नऊ वाजता आळंदी फाटा ( चाकण ) येथील कंपनी आवारात जमून कंपनी प्रशासनाला जाब विचारणार आहेत.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.