महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : करंजविहिरे जवळील थोपटवाडी ( ता. खेड ) येथे एक सतरा वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. या युवतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून दुपारच्या सुमारास झाला असून सदरहू मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. आरती सोपान कलवडे ( वय १७, रा. थोपटवाडी, ता. खेड, जि. पुणे ) असे या युवतीचे नाव असून या खुनाबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या खुनाचे कारण अद्याप समजले नाही. चाकण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम पोलिसांकडे सुरू होते. चार संशयितांची नावे फिर्यादीकडून सांगण्यात आल्याचे समजते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.