प्रशासकीय

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतुकीत बदल, 1 जानेवारीला या तीन मार्गावरील वाहतूक राहील पूर्णपणे बंद..

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 28 : मौजे पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतुक दि. 1 जानेवारी 2021 रोजी 00.01 पासून रात्री 24.00 वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेकामी व प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे ग्रामीणमधील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पेरणे ता. हवेली येथे 1 जानेवारी 2021 रोजी जयस्तंभ कार्यक्रमाचे अनुषांगाने येथे दि. 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 17.00 पासून ते दि. 1 जानेवारी 2021 रात्री 24.00 वा. पर्यंत जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातून व परराज्यातून नागरीक येत असतात. महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्याकडील परिपत्रकान्वये सदर अभिवादनाचा कार्यक्रम कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात व साध्या पदध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमारीता पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावरील वाहतूक दि. 1 जानेवारी 2021 रोजीच्या 00.01 पासून ते रात्री 24.00 वाजेपर्यंत खाजगी व सार्वजनिक वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यास पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी विनंती केलेली आहे.

वाहतुक बंद करण्यात येणारे मार्ग :-
चाकण तळेगांव चौक-शेल पिंपळगांव-बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावी.

● आळंदी-शेलपिंपळगाव-बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावी.

● आळंदी-मरकळ-कोयाळी-शेलपिंपळगाव-बहुळ-साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावी.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 117 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन मौजे पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावारील वाहतुक दि. 1 जानेवारी 2021 रोजी 00.01 पासून रात्री 24.00 वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेकामी व प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

3 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.