Categories: कृषीखेड

वृक्षारोपण करून केला कृषी दिन साजरा

खेड पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा संयुक्त उपक्रम
महाबुलेटीन नेटवर्क
राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्यातील हरीत क्रांती व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती खेड व तालुका कृषी अधिकारी कार्यालय खेड यांनी संयुक्त विद्यमाने कृषीदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  खेड पंचायत समिती कार्यक्षम सभापती अंकुश राक्षे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे होते. यावेळी माजी उपसभापती भगवान पोखरकर, गट विकास अधिकारी अजय जोशी, उपसंचालक खटावकर मॅडम, खेडचे उपविभागीय कृषी अधिकारी माने मॅडम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. फाळके व डॉ. सावळे, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे  शास्त्रज्ञ श्री. टेमकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. कैलास कोहिणकर, मृदा सर्वेक्षण अधिकारी श्री. वाडकर, पंचायत समिती खेडचे कृषी अधिकारी ढवळे, मंडल कृषी अधिकारी वेताळ, श्री. वाणी, विस्तार अधिकारी श्री. मुल्ला, श्री. ओव्हाळ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
करोना बाबतची योग्य दक्षता घेऊन कृषी दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये कृषी संजीवनी सप्ताहचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.