शैक्षणिक

विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, चाकण विद्यालयाच्या निकालाची १००% पंरपरा कायम..

विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, चाकण विद्यालयांच्या १००% पंरपरा कायम..

महाबुलेटीन न्यूज । चाकण
श्री.एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, चाकण च्या निकालाची पंरपरा या ही वर्षी कायम राहिली. एस.एस.सी. माध्यमिक शालांत परिक्षा २०२१ मध्ये विद्यालयांच्या १००% निकालांची पंरपरा कायम राखली.

एस.एस.सी. माध्यमिक शालांत परिक्षा २०२१ मध्ये विद्यालयांमधून १२४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. विद्यालयातील ४९ विद्यार्थी डिस्टीक्शन, ५३ विद्यार्थी ग्रेड १, २२ विद्यार्थी ग्रेड २ मध्ये उत्तीर्ण झाले. विद्यालयातील कु. किरण कैलास पठारे हिला ९५.६०% टक्के मिळवत प्रथम, कु. समृद्धी महेश पानसरे ९४.००%, कु. रोशन जाधव ९३.४०%, कु. मृणाल मोहिते ९३.००% तर कु. सौरभ घुले ९२.४०% अनुक्रमे पास झाले आहेत. 

विद्यालयात कोवीड काळात वर्षभर चांगले उपक्रम राबवले तसेच ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यालयातील शैक्षणिक धोरण व विकास यांचा पाया मजबूत करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. शामराव देशमुख नेहमी लक्ष देत असतात व पायाभूत सुविधा वेळेत मिळतील यांची दखल घेतात. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी वर्षभर मेहनत घेतल्यामुळे विद्यार्थी चांगल्या टक्के वारीने पास झाली, असे कौतुक संस्थेच्या सचिव सौ. रोहिणी देशमुख यांनी नमुद केले. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री शामराव देशमुख यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यालयातील इयत्ता १० वीचे वर्गशिक्षक श्री. संजय नवसरे, सौ. शितल थोरात, सौ. संध्या वाळुंज, सौ. मिनल चौधरी, श्री. संतोष हलवले व श्री सोमनाथ हाथुरे यांचे निकालांच्या यशाबद्दल विशेष कौतुक केले. या छोट्या खाणी कार्यक्रमांचे स्वागत सौ. स्वाती रणदिवे यांनी केले. सदर कार्यक्रमानिमित्त दोन्ही शाळांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.