महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : आश्रमशाळेच्या प्रश्नांसंदर्भात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, सर्व पदाधिकारी व संस्थेचे कर्मचारी यांनी दि.५ सप्टेंबर पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत, कोरोनाविषयक सर्व शासकीय नियम पाळून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आश्रमशाळेकडील विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित द्यावे. आश्रमशाळेकडील कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न त्वरित सोडवावेत. बहुजन कल्याण विभागाचे वादग्रस्त प्रधान सचिव जगदीश प्रसाद गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे, या त्यांच्या मागण्या आहेत. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत हे बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे पदाधिकारी व भिमाई प्राथमिक आश्रमशाळा, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक आश्रमशाळा, राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालय, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह (मुलांचे), फातिमा शेख मुलींचे वसतीगृह या संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
——-
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.