महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा विषेश सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश बोरुडे, संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे, सल्लागार रमेश जाधव गुरुजी, कार्याध्यक्ष प्रा. महादेव वाघमारे, सचिव प्रा. ऋषीकेश लोंढे, प्रकल्प प्रमुख जगन्नाथ ऊर्फ काकासाहेब काळे, राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, प्रेस फोटोग्राफर चित्रसेन जाधव, अंकुश दाभाडे आदी उपस्थित होते.
शाल, श्रीफळ आणि तुकाराम महाराज गाथा ग्रंथ देऊन डॉ. वाघमोडे यांना सन्मानित करण्यात आले. व्यवस्थापन ( मॅनेजमेंट ) विषयातील अभ्यास पूर्ण प्रबंध सादर केल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अमरनाथ वाघमोडे यांना पीएचडी बहाल केली. पोलीस खात्यातील जबाबदारी सांभाळून हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ऋषकेश लोंढे यांनी प्रास्ताविक केले. गणेश बोरुडे व विलास भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सत्काराने मी भारावून गेलो असून काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन डॉ. वाघमोडे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.