आरोग्य

वापरात आलेले पीपीई कीट उघड्यावर

वापरात आलेले पीपीई कीट उघड्यावर,
लोकांमध्ये संतापाची भावना

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सरकारी मळ्याच्या संरक्षक भिंतीजवळ वापरात आलेले पीपीई कीट व इतर वैद्यकीय कचरा टाकल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.१९ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आला आहे.

फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी जाणा-या लोकांनी ही बाब पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्याच्या अलिकडे सर्विस रोडला लागून सरकारी मळ्याची संरक्षक भिंत आहे. सर्विस रोडपासून पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पीपीई कीट व इतर वैद्यकीय कचरा टाकून देण्यात आलेला आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयाच्या पटांगणात प्रवेश बंद करण्यात आला आहे. चालण्याच्या व्यायामासाठी महामार्ग व इतर रस्त्यांचा पर्याय म्हणून वापर लोक करत आहेत. महामार्गावरून चारचाकी, दुचाकी व अवजड वाहनांची वर्दळ सातत्याने सुरु असते. सकाळी व संध्याकाळी पायी चालण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात.

कोरोनाग्रस्तांजवळ जाण्याची, प्रसंगी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची मुभा ही शासन यंत्रणा कोणाला देत नाही. या पार्श्वभूमीवर हा कचरा उघड्यावर टाकला जाणे, म्हणजे या सर्वांच्याच आरोग्याशी खेळणे आहे. या भावनेमुळे लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

वैद्यकीय कचरा कोणाचा ? माहीत नाही : उपजिल्हा रुग्णालय
दरम्यान, या संदर्भात इंदापूर उपजिल्हा शासकीय रूग्णालय व विलगीकरण कक्षाच्या सूत्रांना विचारणा केली असता, वापरात आलेले पीपीई कीट व इतर वैद्यकीय कचरा सर्व खबरदारी घेवून नियमितपणे जाळून टाकला जातो असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे हा धोकादायक वैद्यकीय कचरा कोणाचा, तो कोणी टाकला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.